Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

महाराष्ट्राचे भाऊजी व शिवसेना नेते आदेश बांदेकर कष्टकरी महिलांसाठी घेऊन येत आहेत शिवसेनेचा ‘माऊली संवाद’ कार्यक्रम

महाराष्ट्राचे भाऊजी व शिवसेना नेते आदेश बांदेकर कष्टकरी महिलांसाठी घेऊन येत आहेत शिवसेनेचा ‘माऊली संवाद’ कार्यक्रम

मुंबई: विधानसभा निवडणुकीपूर्वी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा ‘आदित्य संवाद’ कार्यक्रम जोरात सुरू असतानाच आता शिवसेनेनं आणखी एक ‘माऊली संवाद’ उपक्रमाची सुरवात केलीय. शिवसेना सचिव आदेश बांदेकर आता महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी आणि समाजातील सर्वच घटकांतील महिलांशी ‘माऊली संवाद’ च्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.

निवडणुकीत एकुण मतदारांपैकी अर्धी मतदार संख्या ही महिलांची आहे. त्यामुळे या एवढ्या मोठ्या मतदार वर्गाला आकर्षित करण्यासाठी, शिवसेनेनं आदेश बांदेकर यांचा चेहरा महाराष्ट्राच्या निवडणुक मैदानात उतरवलांय. आदेश बांदेकरांच्या ‘माऊली संवाद’ या उपक्रमाची सुरवात पालघर जिल्ह्यातील विक्रमगड या आदिवासी बहूल तालुक्यातून होणार आहे. २ आँगस्ट पासून शिवसेनेचा ‘माऊली संवाद’ सुरू होणार आहे. या उपक्रमामुळे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेत्तृत्वात आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतला महाराष्ट्र घडवण्यासाठी महिलांच्या सुचनांचा नक्कीच ऊपयोग होईल तसेच विधानसभा निवडणुकीसाठी हा ऊपक्रम ऊपयुक्त ठरेल असे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *