राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना टोला, म्हणाले “टाळी वाजवल्याने त्यांना मदत मिळणार नाही”
नवी दिल्ली: माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी उद्या रविवार दि.२२ च्या जनता कर्फ्युतील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या थाळीनाद उपक्रमाबद्दल टीका केली आहे.
यासंदर्भात त्यांनी ट्विट करता म्हटले आहे की,
“कोरोना व्हायरस हा आपल्या नाजूक अर्थव्यवस्थेवर एक कठोर प्रहार आहे. छोटे, मध्यम व्यावसायिक व कंत्राटी तसेच रोजंदारीवर काम करणारे कामगार यामुळे प्रभावित आहेत. टाळी वाजवल्याने त्यांना मदत मिळणार नाही. आज रोख मदत, करांत सूट तसेच कर्जफेडीत सवलत अशा मोठ्या आर्थिक पॅकेज ची गरज आहे. त्वरित पावले उचला.”
