“किमान समान कार्यक्रम तयार करून त्यावर तीनही पक्षांनी हस्ताक्षर केले होते” मंत्री नवाब मलिक यांचे स्पष्टीकरण
मुंबई: मंत्री अशोक चव्हाण यांनी २६ जानेवारी रोजी शिवसेनेबाबत केलेल्या वक्तव्यावरून सुरू झालेला राजकीय धुरळा आद्यप शांत व्हायचं नाव घेत नाहीये. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी स्पष्टीकरण दिले आहे. एका वृत्त वाहिनीला मुलाखत देताना ते म्हणाले की, “महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी सरकार स्थापन करण्यापूर्वी मुंबई व दिल्ली येथे बैठकी घेतल्या होत्या, महाराष्ट्राच्या विकासाकरिता भारतीय संविधानानुसार किमान समान कार्यक्रम तयार करून त्यावर तीनही पक्षांनी हस्ताक्षर केले होते. कोणत्याही एकाच पक्षाने हस्ताक्षर केले असे नाही.”
या स्पष्टीकरणामुळे मंत्री अशोक चव्हाण तोंडघशी पडल्याचे दिसत आहेत.
