Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

सुप्रसिद्ध चित्रकार निलेश पालव यांच्या चित्रप्रदर्शनाचे माजी पोलिस महासंचालक ए. एन. रॉय यांच्याहस्ते नेहरू सेंटर येथे झाले उद्घाटन

सुप्रसिद्ध चित्रकार निलेश पालव यांच्या चित्रप्रदर्शनाचे माजी पोलिस महासंचालक ए. एन. रॉय यांच्याहस्ते नेहरू सेंटर येथे झाले उद्घाटन

मुंबई: आपण जेव्हा झोपेत असतो त्यावेळेस आपल्याला निरनिराळी स्वप्न पडत असतात. यात कधी आपण प्रत्यक्ष न अनुभवलेल्या अशा वेगळ्याच विश्वात विहार करत असतो तर कधी अस्तित्वात नसलेले जीव आपल्याला त्या स्वप्नात दिसत राहतात. निद्रेच्या त्या उन्मनी अवस्थेत आपले सुप्त मन जागृत असते. अशा वेळी अनुभवलेल्या त्या विशाल अंतहीन विश्वाला कॅनव्हासवर मांडण्याची किमया सुप्रसिद्ध चित्रकार निलेश पालव यांनी केली आहे.

काल दि. २८ रोजी महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक अनामी रॉय व सॉलिसिटर परिमल श्रॉफ यांच्या हस्ते मुंबईतील नेहरू सेंटर येथे निलेश पालव यांच्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात देश-विदेशातील कला प्रेमींनी उपस्थिती दर्शविली होती. ‘महाराष्ट्र वार्ता’ या प्रदर्शनाची मीडिया पार्टनर आहे. दिनांक ३ फेब्रुवारी पर्यंत चालणारे हे प्रदर्शन सकाळी ११ ते सायंकाळी ७ दरम्यान विनामूल्य पाहता येऊ शकते. यावेळी तुम्हाला थेट चित्रकार निलेश पालव यांच्याशी संवाद साधून व चित्रातील गूढ उलगडता येऊ शकते.

पत्ता : नेहरू सेंटर आर्ट गॅलरी, डिस्कवरी ऑफ इंडिया बिल्डिंग, डॉ. ऍनी बेझंट रोड, वरळी, मुंबई – ४०००१८

२८ जानेवारी ते ३ फेब्रुवारी

वेळ : सकाळी ११.०० ते संध्याकाळी ७.००

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *