रायगड जिल्ह्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी लवकरच रेवस-करंजा पुलाची उभारणी – आ. महेंद्र दळवी
रायगड जिल्ह्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी लवकरच रेवस-करंजा पुलाची उभारणी करण्यात येईल असं आश्वाासन अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी दिलं आहे.
मुरूड महोत्सवाचं काल आमदार दळवी यांच्या हस्ते उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. रेवस-करंजा पूल रायगडला मुंबईशी जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरेल असं त्यांनी सांगितलं. मुरूड महोत्सव दरवर्षी ३१ डिसेंबरला साजरा केला जातो. त्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येनं पर्यटक या महोत्सवासाठी येतात.
