भाजप प्रवक्ते म्हणतात “नशीब कसाबला फाशी झाली नाहीतर सरकारने त्याचेही गुन्हे मागे घेतले असते”
मुंबई: नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारताच “आरे मेट्रो कारशेड” व “नाणार रिफायनरी” विरोधी आंदोलनातील आंदोलनकर्त्यांवर असलेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले. यानंतर एका बाजूला या आंदोलनांशी संबंधित कार्यकर्ते व संघटना यांनी जल्लोष केला तर दुसऱ्या बाजूला भाजपकडून या निर्णयावर अप्रत्यक्ष टीका करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी भाजपचे मुंबई सरचिटणीस भारतीय यांनीही आरे आंदोलनकर्त्यांच्या गुन्ह्यांची तुलना कुविख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद शी करता ट्विट केले होते.
आज असेच एक ट्विट भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी केले असून यात त्यांनी ठाकरे सरकार वर टीका करताना २६/११ दहशतवादी हल्ल्यातील फिदायीन हल्लेखोर कसाबच्या फाशीचा उल्लेख केला आहे. वाघ आपल्या ट्विट मध्ये म्हणतात की, “नशीब…
कसाबला फाशी झाली
नाहीतर त्याच्यावरचे गुन्हेही या महाराष्ट्र सरकारने कदाचित मागे घेतले असते….”
या ट्विट नंतर अवधूत वाघ यांना ट्रोलर्स नी प्रत्युत्तर दिलं.
नशीब
तुमची सत्ता गेली
सामान्यांना दाऊद आणि कसब बनवून
टाकलं असत तुम्हीमूर्खांचा बाजार
— Abhit Bhagwat – अभित शिवाजी भागवत (@AB_Yuvasena) December 4, 2019
हेच का तुमचे पर्यावरण प्रेम???
विनाश काले विपरीत बुद्धि!!!— Sameer H.Gaykar (@SamGaykar) December 4, 2019
तुम्हाला जर आतंकवादी आणि महाराष्ट्रातील
सामान्य जनतां हयातील फरक कळंत नसेल तर खरंच अवघड आहे साहेब तुमचे 🤔 विरोध
निश्चित करा पण तत्व निष्ठ विरोध करा उगाच
विरोधाला विरोध म्हणुन काही ही विरोध करु
नका बाकी तुमची मर्जी सर.— अभिजीत शरयु विलास औताडे (@abhiautade) December 4, 2019
