NCP Png File
राष्ट्रवादीच्या मुंबईतील चार जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
यंदाचं वर्ष निवडणुकीच वर्ष असल्याने सर्वच पक्ष निवडणुकीची जोरदार तयारी करत असल्याचे दिसत आहे. पक्षांतराचा हंगामही आता सुरु व्हायला लागला आहे. त्याची सुरुवात मुंबईतल्या राष्ट्रवादीच्या चार जिल्हाध्यक्षांनी आपले राजीनामे पक्ष श्रेष्ठींकडे सोपवून केली आहे. त्यामुळे मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसला आहे.
उत्तर मुंबईचे जिल्हाध्यक्ष अरुण मिश्रा, दक्षिण मध्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष रंगनाथन अय्यर, दक्षिण मुंबईचे जिल्हाध्यक्ष सुनिल पालवे आणि ईशान्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र थोरात चार जिल्हाध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांकडे आपले राजीनामे दिले आहेत.
राष्ट्रवादी मुंबई युवक अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली आपण काम करू शकत नाही. राष्ट्रवादी मुंबई युवक अध्यक्ष पक्षाच्या कामाबद्दल कोणत्याच गोष्टी मध्ये आम्हला विश्वासात घेत नाहीत. त्यामुळे आम्ही राजीनामा देत आहोत असे चारही जिल्हाध्यक्षांनी यावेळी सांगितले. चारही जिल्हाध्यक्ष लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे खासगीत सांगितले जात आहेत.
