डॉ. आनंद तेलतुंबडेंना 12 फेब्रुवारीपर्यंत दिलासा
मुंबई हायकोर्टाने आज प्राध्यापक डॉ. आनंद तेलतुंबडे यांच्या अंतरिम जामीन अर्जावरील सुनावणी ११ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली आहे. याशिवाय मुंबई हायकोर्टाने त्यांना १२ फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे. ज्येष्ठ विचारवंत डॉ. आनंद तेलतुंबडे यांचा नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून पुणे पोलिसांनी २ फेब्रुवारीला त्यांना मुंबई विमानतळावरुन अटक केली होती.
राज्य सरकारने तेलतुंबडे यांच्या अटकपूर्व जामीनाला कडाडून विरोध केला. आनंद तेलतुंबडे यांना पुणे पोलिसांनी केलेली अटक हि बेकायदेशीर असल्याचं सांगत पुणे कोर्टाने त्यांना तूर्तास दिलासा दिला आहे.