काँग्रेस चा शपथनामा जाहीर, दारिद्रय निर्मूलन, लैंगिक समानता, दर्जेदार शिक्षणासह १७ उद्दिष्टांचा केलाय अंतर्भाव
मुंबई: विधानसभा निवडणुकीचे ज्वर आता हळूहळू वाढत जाईल. तत्पूर्वी मतदारांना सत्तेत आल्यावर आम्ही काय काय करू शकतो याची आश्वासने देणे गरजेचे आहे. यात शुभारंभ केला आहे काँग्रेस-राष्ट्रवादी-मित्रपक्ष आघाडीने.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या आघाडीने आज आपला ‘शपथनामा’ प्रसिद्ध केला आहे. यात आघाडीने संयुक्त राष्ट्रांच्या पुढील पंधरा वर्षांसाठी निश्चित केलेल्या १७ शाश्वत उद्दिष्टांचा अंतर्भाव केला आहे. ज्यात दारिद्रय निर्मूलन, उपासमारीची समाप्ती, लैंगिक समानता, दर्जेदार शिक्षण, हवामानबदलावरील कृतीस अनुसमर्थन असे काही प्रमुख मुद्दे आहेत.

काँग्रेस ने याबाबत ट्विट करत असे म्हंटले आहे की, “शिक्षण, आरोग्य, कृषी, पायाभूत सुविधा आणि इतर क्षेत्रांमधील बदल घडणार…भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, मित्रपक्षांची महाआघाडी महाराष्ट्राचं सुवर्णयुग परत आणणार.”
