स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४२व्या जयंतीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
मुंबई, दि. २८ : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४२ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवन येथे स्वातंत्र्यवीरांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, उपसचिव एस. राममूर्ती तसेच राजभवनातील अधिकारी, कर्मचारी व पोलीस अधिकारी व जवान उपस्थित होते.
