अमेरिकेने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या इभ्रतीचा केला पाचोळा
अमेरिका/वॉशिंग्टन: अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. त्याचं झालं असं की अमेरिकेत आगमन झाल्या झाल्या त्यांना निरनिराळ्या अपमानांचा अनुभव घ्यावा लागत आहे. अमेरिकेत कोणत्याही देशाच्या प्रमुखांच विमानतळावर जेव्हा आगमन होतं तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री व अधिकारी उपस्थित राहतात. पण इम्रान खान यांचे कोरडे स्वागत करून अमेरिकेने पाकिस्तानचा सरळ-सरळ अपमान केला आहे. पुढे विमानतळावरुन मेट्रो ने प्रवास करत त्यांनी हॉटेल गाठले. या दौऱ्यात ते अमेरिकेतील पाकिस्तानचे राजदूत असद मजीद खान यांच्या निवासस्थानी मुक्काम करणार आहेत.
सध्या जगात पाकिस्तानची प्रतिमा एक दहशतवादी राष्ट्र अशी झालेली आहे. त्यातच पाकिस्ताच्या अर्थव्यवस्थेला मोठंस खग्रास ग्रहण लागलेलं आहे. महागाईच्या निर्देशांकाने नवीन विक्रमच केला आहे. अशात अमेरिकेकडून काही आर्थिक मदत पदरात पाडून घेण्यासाठी या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आज ते व्हाईट हाऊस येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. या भेटीत आर्थिक मदती व्यतिरिक्त द्विपक्षीय संबंध बळकट करण्याबाबतही चर्चा केली जाईल असे मानले जाते.