रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केलं जाहीर
खालापूर, दि. २३: रायगड जिल्ह्यात इर्शाळवाडी इथं दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर २० जुलै पासुन सुरु असलेली बचाव कार्य मोहीम आज संध्याकाळी ६ नंतर थांबवण्यात येत असल्याचं रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केलं. दुर्घटना घडून आज चार दिवस झाले असतानाही बचाव कार्य सुरू होतं. मात्र जोराचा पाऊस, प्रचंड धुकं, सोसाट्याचा वारा आणि दुर्गंधी यामुळे बचाव कार्यात अडथळे येत होते. आज दोन मृतदेह सापडल्यानं मृतांची संख्या २९ झाली आहे. आणखी ५० ते ५२ जण ढिगाऱ्याखाली गाढले गेले असावेत, अशी भिती व्यक्त केली जात आहे.
Source – AIR
