…तर पाकसाठी ती ‘कत्ल की रात’ ठरली असती : पंतप्रधान नरेंद्र मोदी
पाटन, गुजरात : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतून देशभर चाललेल्या प्रचार कार्यक्रमातून वेळ काढून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या होम ग्राउंडवर म्हणजेच गुजरात येथे सभा घेतली. पाटन जिल्ह्यात भाजपच्या सभेत बोलताना नरेंद्र मोदींनी पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईक व बालाकोट एयर स्ट्राईकचा पुनः एकदा उल्लेख केला. ते म्हणाले की पाकिस्तानने जेव्हा विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना पकडलं तेव्हा मी पाकिस्तान ला बोललो की, “जर आमच्या वैमानिकाला काही झालं तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. ती त्यांच्यासाठी काळरात्र(कत्ल की रात) ठरली असती.” त्यांच्या या वाक्यावर मोदी-मोदी चा जयघोष झाला. पुढे आपल्या भाषणात त्यांनी गुजराती माणसाला भावनिक साद घालून सर्वच्या सर्व २६ जागा निवडून देण्याचे आवाहन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या भाषणावर ज्यात त्यांनी लष्करी कारवाई चा उल्लेख केला आहे यावर विरोधक काय प्रतिक्रिया देतात याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. काही दिवसांपूर्वी निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी याचा निषेध व्यक्त केला होता.
