मी गेल्या ५ वर्षात पूर्ण इमानदारीने तुमच्या व्यापार व जीवनाला सुरळीत करण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले आहेत – पीएम नरेंद्र मोदी
मी गेल्या ५ वर्षात पूर्ण इमानदारीने तुमचा व्यापार व जीवनाला सुरळीत करण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले आहेत. त्यामुळे माझी अपेक्षा आहे की आपण चिंतामुक्त होऊन, कोणतीही भीती न बाळगता काम करावे असे म्हणत नवी दिल्ली येथील व्यापारी संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समस्त व्यापारी वर्गासमोर आपल्या कामाचा लेखाजोखा मांडत मतांचा जोगवा मागितला. व्यापारी ज्या कुशलतेने उपलब्ध साधनांचा वापर करण्याचे कसब अंगी बाणवून गेली शेकडो वर्षे या देशाला खूप काही दिलं आहे.
काँग्रेस वर टीका करताना ते म्हणाले की, “देश स्वतंत्र झाल्यानंतर काँग्रेस ने व्यापाऱ्यांना घेऊन एक धारण बनवली होती की देशात जी काही गडबड होत आली आहे ती व्यापाऱ्यांमुळेच. काँग्रेस च्या साठेबाजांनी महागाईच्या खेळात स्वतःचा फायदा करून घेतला आणि सारा दोष व्यापाऱ्यांवर ढकलून दिला”
या संमेलनात पंतप्रधानांनी केंद्र शासनाने व्यापाऱ्यांसाठी आणलेल्या योजना, कायदे बदल केल्यामुळे झालेले फायदे यांचा पाढा वाचून दाखवला. या वेळी त्यांनी एक मोठी घोषणाही केली. ते म्हणाले आम्ही जीएसटी च्या अंतर्गत नोंदणीकृत सर्व व्यापाऱ्यांना १० लाख रूपयांपर्यंतचा ‘दुर्घटना विमा’ उपलब्ध करून देऊ. तसेच किसन क्रेडिट कार्ड सारखेच व्यापाऱ्यांसाठी ‘व्यापारी क्रेडिट कार्ड’ ची योजना आणू.
LIVE: PM Shri @narendramodi addresses 'Traders Sammelan' in New Delhi. #BharatMangeModiDobara https://t.co/G59PbcZ2EM
— BJP (@BJP4India) April 19, 2019
