Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

शिवसेना खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांचा पनवेल येथे झंझावाती दौरा 

शिवसेना खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांचा पनवेल येथे झंझावाती दौरा

पनवेल : महाराष्ट्रातील सर्वात चर्चील्या गेलेल्या प्रमुख मतदारसंघांपैकी एक असा मतदारसंघ म्हणजे मावळ लोकसभा मतदार संघ. या मतदार संघात राष्ट्रवादीचे दिग्गज नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार व सातत्याने संसद रत्न पुरस्कार मिळालेले शिवसेना-भाजप महायुतीचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांच्यात चुरशीची लढत आहे. याच पार्श्वभूमीवर खा. श्रीरंग अप्पा बारणे हे काल (दि.१९) पनवेल येथे प्रचार दौऱ्यावर होते. या दौऱ्या प्रसंगी त्यांनी पनवेल शहर तसेच ग्रामीण भागात भेटीगाठी घेतल्या. खारघर जलवायु विहार वसाहत व माऊंट ब्लॅक सोसायटी येथे नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत आ. प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमल, सभागृह नेते परेश ठाकूर, शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरात व महानगरप्रमुख रामदास शेवाळे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

तसेच सकाळच्या सत्रात त्यांनी आय. के. मरिन एजेन्सी, कळंबोली येथे कामगार बैठक घेऊन कामगारवर्गाशी संवाद साधला. त्यांनंतर स्टील चेम्बर टॉवर येथे त्यांनी कार्यकर्त्यांना व प्रमुख पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. मतदानादिवशी जास्तीत जास्त लोकांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणे गरजेचे आहे यावर त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. या प्रसंगी उरण चे शिवसेना आमदार मनोहर भोईर, अरुण भगत, भाजप सरचिटणीस महेश बालदी, तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील तसेच भाजप तालुका संघटक दशरथ म्हात्रे उपस्थित होते. या दौऱ्यात शिवसेना व भाजपच्या पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती. विशेष म्हणजे गटातटात विखुरलेली पनवेल येथील शिवसेना कार्यकारिणीहि यावेळी एकसंध वाटली.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *