वाचा काँग्रेसचा ‘जन आवाज’ जाहीरनामा
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने आपला ‘जन आवाज’ जाहीरनामा आज प्रसिद्ध केला आहे. जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर ‘हम निभाएंगे’ आश्वासन देण्यात आले आहे.
मंगळवारी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद आयोजित करत काँग्रेस पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, मनमोहन सिंह, पी. चिदंबरम आणि सुरजेवाला यांच्यासह काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते.
काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या जाहिरनाम्यात एकूण ५ सर्वात महत्त्वाच्या गोष्टींवर भर देण्यात आला असून त्यात न्याय ही सर्वात पहिली संकल्पना असल्याचे राहुल गांधी यांनी घोषित केले.
काँग्रेसचा जाहिरनामा पुढील प्रमाणे:
१) १० लाख युवांना ग्रामपंचायतीत नोकऱ्या देणार
२) सत्तेत आल्यास सहा महिन्यांमध्ये २२ लाख नोकऱ्या निर्माण करणार.
३) देशातील गरिबांच्या खात्यात वर्षाला ७२००० रुपये जमा केले जातील.
४) काँग्रेस सत्तेत आल्यास मनरेगा योजनेअंतर्गत 100 ऐवजी 150 दिवसांचा रोजगार देणार
५) ‘न्याय’ नुसार एका वर्षा ७२ हजार, तर ५ वर्षांमध्ये एकूण ३.६० लाख रुपये गरिबांच्या खात्यात जमा करणार.
६) काँग्रेस सरकार सत्तेत आल्यास शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करणार
७) नोटबंदीमुळे खिळ बसलेल्या अर्थव्यवस्थेला प्रवाहित करणार.
८) तरुणांना उद्योगांसाठी 3 वर्षांसाठी कोणाचीही परवानगी घ्यावी लागणार नाही. बँकांचे दरवाजे खुले असतील.
९) शेतकऱ्यांनी कर्ज फेडलं नाही, तर फौजदारी गुन्हा दाखल होणार नाही.
१०) शिक्षणावर जीडीपीच्या 6 टक्के खर्च करणार
