येत्या २- ३ दिवसात विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता
राज्याच्या काही भागात उन्हाची तीव्रता जाणवत असतानाच काही ठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. काल महाबळेश्वर, साताऱ्यात जोरदार पाऊस पडला. राज्यात काल सर्वाधिक ४५ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद वर्धा इथं झाली.
येत्या दोन तीन दिवसात विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. तर कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. ऊर्वरित राज्यात हवामान कोरडे राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
