जाणून घ्या दिवंगत मनोहर पर्रिकरांचा जीवन प्रवास
- संपूर्ण नाव: मनोहर गोपाळकृष्ण प्रभु पर्रीकर
- जन्म: १३ डिसेंबर १९५५ रोजी गोव्यामधील म्हापसा येथे झाला.
- शालेय शिक्षण: प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. माध्यमिक शिक्षण मराठीतून झाले.
- महाविद्यालयी शिक्षण: भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT), मुंबई येथून इ.स. १९७८ साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. (आयआयटी ची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री आहेत.)
- महाविद्यालयीन विद्यार्थी असल्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत होते.
राजकीय कारकीर्द:
- १९९४ साली पहिल्यांदा आमदार झाले.
- ऑक्टोबर २००१ मध्ये पहिल्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले. परंतु थांचे सरकार केवळ दिड वर्षच राहिले.
- जून २००२ मध्ये मनोहर पर्रीकर पुन्हा एकदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले.
- त्यांनी २००२- २००५, २०१२-२०१४, आणि २०१७-२०१९ साला पर्यंत गोव्याचे मुख्यमंत्री पद सांभाळले.
- पर्रीकरांनी ९ नोव्हेंबर २०१४ रोजी केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.
- पर्रीकर सरंक्षण मंत्री असतानाच उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तनवर सर्जिकल स्ट्राईक केले.
- २०१७ साली त्यांनी सरंक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिला.
- १३ मार्च २०१७ मध्ये पुन्हा मनोहर पर्रीकर यांनी गोव्याच्या मुखमंत्रीपदाची शपथ घेतली.
- २०१८ मध्ये त्यांना स्वादुपिंडाचा कर्करोग झाला.
- वयाच्या ६३ व्य वर्षी मनोहर पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.