Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मनोहर पर्रीकर फक्त भाजपचे नव्हे तर देशाचे आशास्थान होते – उद्धव ठाकरे

मनोहर पर्रीकर फक्त भाजपचे नव्हे तर देशाचे आशास्थान होते – उद्धव ठाकरे

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या दुःखद निधनाने देशाने एक महान सुपुत्र गमावला आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपला शोक व्यक्त केला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री व देशाचे माजी संरक्षणमंत्री राहिलेल्या मनोहर पर्रीकरांसोबतच्या आठवणींना उजाळा देताना ते म्हणाले की, “राजकारणात मुख्यमंत्रीपद व देशाचे संरक्षणमंत्रीपद भूषवणाऱ्या व्यक्तीने किती साधे असावे याचे उदाहरण म्हणजे मनोहर पर्रीकर. पर्रीकर आणि आमचा स्नेहसंबंध होता.” पुढे ते म्हणाले गोव्यासारख्या लहान राज्यातून राजकीय कारकीर्द सुरू करून ते देशाचे संरक्षणमंत्री झाले ते त्यांच्यातील प्रामाणिकपणामुळेच. अत्यंत अवघड स्थितीत त्यांनी संरक्षणमंत्रीपद भूषवले. उरी हल्ल्यानंतर पाकिस्तान वर झालेल्या सर्जिकल स्ट्राईक चे नेतृत्व हे संरक्षणमंत्री म्हणून पर्रिकरांनीच केले होते. ते फक्त भाजपचे नव्हे तर देशाचे आशास्थान होते. मी माझ्या लाखो शिवसैनिकांकडून त्यांना श्रद्धांजली वाहत आहे.”

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *