वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागात २० ते २२ फेब्रुवारीपर्यंत रात्री ८ ते सकाळी ८ वाजेपर्यंत संचारबंदी लागू
वर्धा: दिवसेंदिवस कोरोनाचा प्रार्दुभाव मोठया प्रमाणात वाढत असल्याने, रुग्णसंख्या नियंत्रणासाठी आणि कोरोनाच्या संक्रमणाची साखळी तोडण्याकरीता वर्धा शहर आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज शनिवार २० फेब्रुवारी ते सोमवार २२ फेब्रुवारी या काळात रात्री ८ ते सकाळी ८ वाजेपर्यंत संचारबंदी राहणार आहे.
वर्धा जिल्हयातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थी मोठया प्रमाणावर कोरोना बाधीत होत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये कोरोना आजाराचा प्रसार रोखण्यासाठी इयत्ता ५ ते १२ वी पर्यंतच्या शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवणे आवश्यक असल्यामुळे, २२ फेब्रुवारीपासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश प्रेरणा देशभ्रतार यांनी दिले आहेत.
Source – AIR
