प्राप्तीकर(IT) परतावे भरण्याच्या मुदतीत पुन्हा एकदा वाढ
नवी दिल्ली: कोविड-19 च्या उद्रेकामुळे करदात्यांसमोर असलेल्या वैधानिक आणि नियामक अनुपालन पूर्ण करण्यात आलेल्या आव्हानांचा विचार करता सरकारने 31 मार्च 2020 रोजी कर आकारणी व इतर कायदे (काही तरतुदींना शिथिलता) अध्यादेश, 2020 (‘अध्यादेश’) जारी केला होता, जे इतर बाबींसह विविध मुदती वाढविण्यास परवानगी देते. त्यानंतर या अध्यादेशाऐवजी कर आकारणी व इतर कायदे (काही तरतुदींचे शिथालीकरण व दुरुस्ती) कायदा आणला.
अध्यादेशानुसार सरकारने 24 जून, 2020 रोजी अधिसूचना जारी केली, त्यानुसार, आर्थिक वर्ष 2019-20 (मुल्यांकन वर्ष 2020-21) साठी सर्व प्राप्तिकर परतावा देय तारखेची मुदत नोव्हेंबर, 2020 पर्यंत वाढविण्यात आली. म्हणूनच, 31 जुलै, 2020 आणि 31 ऑक्टोबर 2020 पर्यंतच्या उत्पन्नाचा परतावा 30 नोव्हेंबर, 2020 पर्यंत भरणे आवश्यक होते. परिणामी, आयकर कायदा 1961 (अधिनियम) अंतर्गत कर लेखापरीक्षा अहवालासह विविध लेखापरीक्षा अहवाल सादर करण्याची तारीख देखील 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत वाढविण्यात आली.
