आता चीनही पाकिस्तान बरोबर सुरक्षित अंतर राखू इच्छितोय
अमेरिके पाठोपाठ चीन सारखा मित्रही पाकिस्तान बरोबर आता सुरक्षित अंतर ठेवत आहे. चीनने पाकिस्तान आणि त्यांच्यामध्ये असलेली हवाई वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत – पाकिस्तान मध्ये सध्या युद्धजन्य परस्थिती आहे. सुरक्षेची उपाययोजना म्हणून जरी चीन ने हे पाऊल उचलले असले तरी त्याला बरेच कंगोरे आहेत.
पुलवामा हल्ल्यानंतर दाहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी जागतिक समुदायाचा पाकिस्तानवर दबाव वाढला होता. ऑस्ट्रेलिया ने तर भारताला उघड पाठिंबा दिला. अमेरिकेने भारताच्या हवाईला एक प्रकारे समर्थनच दिले. पण चीन ने कशाही प्रकारची उघड भूमिका घेतली नाही. अशा वेळी जागतिक पटलावर असलेली ‘पाकिस्तानचा जवळचा मित्र’ ही प्रतिमा त्यांना मोडणे हे अपरिहार्य होतं. येत्या काळात चीन पाकिस्तान ला करत असलेली मदत कमी करतो की वाढवतो हे पाहणे अत्सुक्याचे ठरेल.
