वैमानिक अभिनंदन आज मायदेशी परतणार, देशातील जनतेचे लक्ष वाघा बॉर्डरकडे
विमान अपघात होऊन पाकिस्तानच्या तावडीत सापडलेले भारताचे पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान आज, शुक्रवारी (दि.१) भारतात परतणार आहेत. त्यांची सुटका करण्याची घोषणा पाक पंतप्रधान इम्रान खान यांनी काल, (गुरुवारी) सायंकाळी पाक संसदेत केली होती.
आज दुपारपर्यंत वाघा बॉर्डरवरून ते भारतात दाखल होतील. त्यांना आणण्यासाठी हवाई दलाचे शिष्टमंडळ वाघा सीमेवर जाणार आहे. तसेच पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे देखील अभिनंदन यांचे स्वागत करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. समस्त भारतवासीयांचेही लक्ष वाघा बॉर्डरवर लागून राहिले आहे.
