परराष्ट्र मंत्रालयाने केली पाकिस्तानी उच्चायुक्ताची कानउघडणी
परराष्ट्र मंत्रालयाने नुकतेच एक जाहीर निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार आज सायंकाळी पाकिस्तानचे भारतातील उप-उच्चायुक्त सय्यद शाह यांना परराष्ट्र मंत्रालयाने तातडीने बोलावून घेतले. पाकिस्तानच्या ताब्यातील भारतीय हवाई दलाच्या वैमानिकाची लवकरात-लवकर व सुखरूप मायदेशी पाठवणी करून द्यावी असे बजावत पाकने केलेल्या उद्दाम हवाई हल्ल्याबाबत तीव्र शब्दांत निषेध नोंदवला.
भारताला त्याच्या मातृभूमीवर होणाऱ्या सीमेपलीकडील दहशतवादी कारवायांना चोख प्रत्युत्तर देण्याचा पूर्ण अधिकार आहे.
भारताच्या जखमी वैमानिकाने छायाचित्र जाहीर करून पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचे तसेच जिनेव्हा परिषदेतील ठरावाचे उल्लंघन केले आहे. यावरही भारताने तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
