Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

आजची खमंग रेसिपी : गाजराची बर्फी

Carrots

आजची खमंग रेसिपी : गाजराची बर्फी

साहित्य : ६ ते ७ गाजर, २ टेबलस्पून तूप, ३/४ कप साखर, १ कप मिल्क पावडर, १ टीस्पून वेलची पावडर, १ लीटर दूध, २ ते ३ टेबलस्पून बारीक कापलेले बदाम आणि सुका मेवा

कृती :

प्रथम एका पॅनमध्ये दूध गरम करण्यासाठी ठेवा. तो पर्यंत गाजरं स्वच्छ धुवून त्यांची सालं काढून किसून घ्या. दूध उकळल्यानंतर त्यामध्ये किसलेलं गाजर एकत्र करून मंद गॅसवर शिजवून घ्या. त्यांनतर त्यामध्ये वेलची पावडर आणि साखर एकत्र करून घ्या. आता एका ताटाला तूप लावून घ्या. तयार मिश्रण त्या ताटामध्ये काढून सेट होण्यासाठी ठेवा.

एक दुसरा पॅन घ्या आणि त्यामध्ये १/२ कप दूध मंद ज्योतीवर उकळून घ्या. दूध उकळल्यानंतर त्यामध्ये मिल्क पावडर टाकून ते एकत्र करून घ्या, मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवून घ्या. त्यानंतर गाजराच्या मिश्रणावर दूधाचं मिश्रण पसरवून घ्या. त्यांनतर गाजराचे मिश्रण थंड झाल्यावर त्या मिश्रणाच्या व्यवस्थित वड्या कापून घ्या. त्या वड्यांवर कापलेले बदाम तसेच इतर सुका मेवा लावा. आता तुमची गोड गोड चविष्ट गाजर बर्फी खाण्यासाठी तयार आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *