“प्रत्येकाने रेल्वे भाड्यापोटी ६०० रुपये भरले” – खुद्द नवी मुंबई पोलीस आयुक्तांच्या दुजोऱ्यामुळे केंद्र सरकार तोंडघशी
नवी मुंबई: कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन दरम्यान जागोजागी अडकलेल्या मजूर व इतर नागरिकांना आपापल्या गावी जायची मुभा केंद्राने दिली. यानंतर रेल्वे मंत्रालयाने मजुरांसाठी विशेष गाड्यांची सोय केली आहे. नवी मुंबई पोलिसांतर्फे पनवेल येथून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, ओरिसा इ ठिकाणी जाणाऱ्या नागरिकांची व्यवस्था व प्रवासाचे योग्य नियोजन करण्यात येत आहे.
याच संदर्भात नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी ट्विट करत माहिती दिली. आज सायंकाळी २४ डब्यांची चौथी गाडी पनवेल येथून तितलीगढ ओरिसा येथे १२०० प्रवाशांना घेऊन निघाली.” यात पुढे त्यांनी नामुद केले की प्रत्येक प्रवाशाने ६०० रुपये भरून आपले तिकीट काढले.”
या ट्विट वर अनेक जणांनी संजय कुमार यांना प्रश्न विचारले की रेल्वे चे भाडे माफ असताना या लोकांकडून पैसे का घेण्यात आले? यावर उत्तर देताना आयुक्त कुमार यांनी कानावर हात ठेवले.
Today evening fourth train with 24 coaches and 1200 passengers left from Panvel to Titilagarh, Odisha. Per person paid Rs 600/-each as cost of ticket . A superb team effort helped in timely departure and maintenance of social distancing.
— Sanjay Kumar ; Rtd. IPS (@sanjayips89) May 9, 2020
मुळात रेल्वे मंत्रालयाने कोणत्याही नागरिकाकडून भाडे घेऊ नये असे जाहीर करूनही सर्रास तिकीटाचे शुल्क आकारले जात आहे हा मोठा विरोधाभास आहे. लॉकडाऊनमुळे आधीच पैशांअभावी मेटाकुटीस आलेला हा गरीब वर्ग मग आपापल्या गावी चालत प्रवासाला निघतोय. आणि मग अचानक अशा वेळीच औरंगाबाद सारखी घटना घडून काळाचा त्यांच्यावर घाला पडतोय. एक जबाबदार पोलीस आयुक्तच जर मजुरांकडून आकारलेल्या तिकीट शुल्काबाबत हवाला देत असेल तर रेल्वे मंत्रालायचं पितळ उघडं पडलं असं म्हणणं अतिशयोक्तीपूर्ण ठरु नये.
