मराठवाड्यातील काही जिल्ह्यात आज पावसाची शक्यता
मुंबई : राज्यभरात उष्म्याचे प्रमाण सातत्याने वाढत असून, कोकण वगळता उर्वरित राज्यातील बहुतांशी शहरांचे कमाल तापमान ४० अंशापार गेले आहे. तर दुसरीकडे मराठवाड्यातील काही जिल्ह्यात आज वादळी वारा, वीजेच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड इत्यादी जिल्हात आज वादळी वारे, वीजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्यांनं दिला आहे.
शेकऱ्यांनी जोराचा पाऊस, वीज चमकत असताना उघड्यावर, झाडाखाली, पाण्याचा स्त्रोत असलेल्या ठिकाणाजवळ जाऊ नये. तसेच विजेच्या खांबाला जनावरे बांधू नये, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
यंदा देशामध्ये सरासरी पेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज खासगी वेधशाळा स्कायमेटने वर्तवला आहे.