अब्दुल सत्तार भाजपच्या वाटेवर?
आगामी लोकसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेसला अजून एक मोठा धक्का बसला आहे. औरंगाबाद मतदारसंघातून काँग्रेसने सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांना उमेदवारी न दिल्याने नाराज सत्तार लवकर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
बुधवारी (03 एप्रिल) रात्री औरंगाबादमधील चिकलठाणा विमानतळावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांच्यात सुमारे ३० मिनिटं महत्त्वाची बैठक पार पडली. बैठक संपल्यावर दानवे आणि सत्तार दोघे एकाच विमानातून मुंबईला आले.
सत्तार यांनी रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे सत्तार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण आलंय.
काँग्रेसने औरंगाबाद मतदारसंघातुन सुभाष झांबड यांची उमेदवारी मान्य नसल्याचं सांगत अब्दुल सत्तार यांनी बंड पुकारलं होतं.