Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला ८८५०३०३४६३ वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा

रेल्वे ने प्रवास करणार्‍या प्रवाशांना आता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून खाद्यपदार्थ ऑनलाइन मागवता येणार; जाणून घ्या सविस्तर माहिती

भारतीय रेल्वेने सुरू केली नवी सेवा

नवी दिल्‍ली/मुंबई, दि. ६: भारतीय रेल्वेचा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेल्या भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ मर्यादितने (आयआरसीटीसी) विकसित केलेल्या विशेष www.catering.irctc.co.in या संकेतस्थळाच्या  तसेच ई-कॅटरिंग अॅप फूड ऑन ट्रॅकच्या माध्यमातून ई-खानपान सेवा सुरू केली आहे.

ई-खानपान  सेवा अधिक ग्राहक-केंद्रित बनवण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत, भारतीय रेल्वेने अलीकडेच रेल्वे प्रवाशांसाठी ई-खानपान सेवेच्या माध्यमातून खाद्यपदार्थ मागविण्यासाठी व्हॉट्सअॅप संपर्क सुरू केला आहे. यासाठी बिझनेस  व्हॉट्सअॅप क्रमांक +91-8750001323 सुरू करण्यात आला आहे.

सुरुवातीला, व्हॉट्सअॅप संपर्कांद्वारे ई-खानपान सेवांची दोन टप्प्यांत अंमलबजावणी करण्याची योजना आखण्यात आली. पहिल्या टप्प्यात www.ecatering.irctc.co.in या दुव्यावर क्लिक केल्यानंतर ई-कॅटरिंग सेवा निवडण्यासाठी ई-तिकीट बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना बिझनेस व्हॉट्सअॅप नंबर संदेश पाठवला जाईल.

या पर्यायासह, ग्राहकांना अॅप डाउनलोड न करताही थेट आयआरसीटीसीच्या ई-खानपान संकेतस्थळाच्या माध्यमातून रेल्वेस्थानकाच्या मार्गावर उपलब्ध असलेल्या त्यांच्या पसंतीच्या रेस्टॉरंटमधून त्यांच्या आवडीच्या खाद्यपदार्थांची मागणी त्यांना नोंदवता येईल.

सुरुवातीला, निवडक रेल्वेगाड्या आणि प्रवाशांच्या ई-खानपान सेवेसाठी व्हाट्स अप संपर्क  सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आणि ग्राहकांचे अभिप्राय आणि सूचनांच्या आधारे, रेल्वे इतर गाड्यांमध्येही ही सुविधा सुरु करेल.

आज, ग्राहकांना दर दिवशी अंदाजे ५०००० भोजनाची मागणी आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून तसेच अॅपद्वारे उपलब्ध करून दिलेल्या ई-खानपान सेवांद्वारे पूर्ण केली जात आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *