पहा फर्स्ट लुक : पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील वेब सिरीज मध्ये हा कलाकार प्रमुख भूमिकेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटानंतर आता त्यांच्या आयुष्यावर बेव सीरिजही येत आहे. इरॉस नॉऊ या दहा भागांची सीरीज सुरु करणार असून प्रसिद्ध अभिनेता महेश ठाकूर यामध्ये मोदींची भूमिका साकारणार आहे. उमेश शुक्ला या वेब सीरिजचं दिग्दर्शन करणार आहे.
गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची माळ गळ्यात पडल्यापासून 2014 मध्ये पंतप्रधानपदाची शपथ घेण्यापर्यंतचा नरेंद्र मोदींचा प्रवास या वेब सीरीजमधून उलगडणार आहे. नुकताच महेश ठाकूर यांचा फर्स्ट लूक लाँच करण्यात आला आहे.
हा पहा त्याचा फर्स्ट लुक
— mahesh thakur (@maheshthakur_) March 13, 2019
मोदींच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाचे लहान मोठे प्रसंग या वेब सीरिजमधून पाहायला मिळणार आहेत. दिल्ली, गुजरात, उत्तराखंड अशा ठिकाणी या वेब सीरिजचं चित्रीकरण करण्यात आलं आहे.