Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

जनसुराज्यच्या डॉ. विनय कोरे यांचा भाजपला पाठिंबा; एकूण संख्याबळ ११४ वर

जनसुराज्यच्या डॉ. विनय कोरे आणि चंद्रपूरचे अपक्ष आमदार जोर्गेवार यांचा भाजपला पाठिंबा; एकूण संख्याबळ ११४ वर

मुंबई: शिवसेना आणि भाजप मध्ये सत्तेतील वाट्यासाठी सध्या मोठया प्रमाणात रस्सीखेच चालू असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे अपक्ष आमदारांना गळाला लावण्याची अहमहिका सध्या चालू आहे. शिवसेनेला आतापर्यंत ५ अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला असून भाजपला आतापर्यंत ९ अपक्षांनी पाठिंबा दिला आहे. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार डॉ. विनय कोरे आणि चंद्रपूरचे अपक्ष आमदार जोर्गेवार यांचा भाजपला यांचेही नाव जोडले गेले आहे. आज जनसुराज्या शक्तीने भाजपला अधिकृतरित्या पाठिंबा दर्शवला आहे. या पाठिंब्यानंतर भाजपचं एकूण संख्याबळ ११४ वर पोहोचलं आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *