Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पार्थसाठी उदयनराजे भोसले प्रचाराच्या मैदानात

पार्थसाठी उदयनराजे भोसले प्रचाराच्या मैदानात

पुणे: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू पार्थ पवार हे मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे ही निवडणूक पवार कुटुंबासाठी प्रतिष्ठेची झाली आहे. त्यांच्यासाठी स्वतः उदयनराजे भोसले पार्थचा प्रचार करणार आहेत. शनिवारी(१३ एप्रिल) संध्याकाळी निगडीत ते प्रचार सभा घेणार आहेत.

शिरूर आणि मावळ लोकसभा मतदार संघातील नागरिकांना राष्ट्रवादीकडे आकर्षून घेण्यासाठी उदयनराजे येथे सभा घेणार आहेत. ही सभा पिंपरी-चिंचवड प्राधिकरण येथील नियोजित महापौर निवास मैदान येथे होणार आहे. उदयनराजे यांच्या सभेला पार्थ पवार यांचे वडील अजित पवार, शिवेंद्रराजे भोसले, रामराजे निंबाळकर, श्रीनिवास पाटील, शशिकांत शिंदे या नेत्यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

मावळ मतदारसंघातून पार्थला निवडून आण्यासाठी संपूर्ण पवार कुटुंबच नात्यागोत्यासह प्रचारासाठी उतरले आहे. पार्थ पवार यांना निवडणून आणण्यासाठी पार्थचे वडील माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार याही अनेक ठिकाणी जात कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत. त्याचप्रमाणे भाऊ जय पवार हा सोशियल मीडिया द्वारे प्रचार करत असून रोहित पवार यांनी देखील अनेक कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेतलेल्या आहेत.

मवाळमध्ये शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचारात थेट उदयनराजे भोसलेंना उतरवल्याने पार्थ पवारांना कितपत फायदा होतो हे पाहणं महत्वाचं आहे.

#parthpawar #shrirangbarne #udayanrajebhosle #rashtrawadicongressparty #shivsena #maval #pune #pimprichinchwad

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *