Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

अभिनेत्री माहिका शर्मा ‘या’ राजकीय नेत्याच्या पडली प्रेमात

अभिनेत्री माहिका शर्मा ‘या’ राजकीय नेत्याच्या पडली प्रेमात

चक्क एका मॉडल आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री माहिका शर्माने हीने सोशल मीडियावर आपल्‍या प्रेमाची कबुली दिली आहे. माहिका ज्या व्‍यक्‍तीच्या प्रेमात पडली आहे ती व्यक्ती म्हणजे, काँग्रेसचे अध्‍यक्ष राहुल गांधी. माहिकाने आपल्‍या इन्‍स्‍टाग्राम अकाउंटवर राहुल यांचा एक फोटो शेअर करत राहुल यांच्‍याबद्‍दल आपले प्रेम व्‍यक्‍त केले आहे.

माहिका शर्माने राहुल गांधी यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत लिहिले आहे की, मी यांच्‍यावर प्रेम करते. कारण, हे आपल्‍या बोलण्‍याने लोकांना हसवतात आणि त्‍यांचे मनोरंजन करतात. आणि हेच एका राजाला करायला हवे. तिने पुढे लिहिले आहे की प्रत्येक चेहर्‍यावर हास्‍य ही एक राजाची जबाबदीरी आहे.

माहिकाच्‍या या पोस्टवरून अजून तरी स्‍पष्‍ट होत नाही की, तिने खरंच, आपले प्रेम व्‍यक्‍त केले आहे की, गंमत म्हणून असे म्हटले आहे. तिच्‍या या पोस्‍टनंतर सोशल मीडियावर अनेक युजर्सनी तिच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे.

माहिका नेहमी आपल्‍या वादग्रस्‍त वक्‍तव्‍यामुळे आणि बोल्ड फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत राहिली आहे.

https://www.instagram.com/memahikasharma/p/BwHHPsLpTrX/?utm_source=ig_share_sheet&igshid=1xgh1wvch9kyu

#rahulgandhi #mahikasharma #congress #maharashtravarta

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *