अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली, दि.१: यंदाच्या दशकातला हा पहिलाच अर्थसंकल्प असून, डिजिटल स्वरुपात उपलब्ध करून दिलेला पहिला अर्थसंकल्प असल्याचेही त्यांनी सांगितले.
हा अर्थसंकल्प आपल्या अर्थव्यवस्थेला सुधारणा आणि शाश्वत विकासाच्या दिशेने घेऊन जाईल असे त्या म्हणाल्या.
आरोग्य आणि समृद्धी, आर्थिक भांडवल तसेच भौतिक आणि पायाभूत सुविधा, आकांक्षी भारतासाठी सर्वसमावेशक विकास, मनुष्यबळाला पुनर्संजीवनी, अभिनवता तसेच संशोधन आणि विकास, किमान शासन कमाल प्रशासन या ६ मूलभूत तत्वांवर यंदाचा अर्थसंकल्प आधारित असल्याचे त्या म्हणाल्या.
