Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

सिद्धिविनायक मंदिर न्यास घेणार धरणग्रस्त तिवरे गावाला दत्तक : आदेश बांदेकर

सिद्धिविनायक मंदिर न्यास घेणार धरणग्रस्त तिवरे गावाला दत्तक : आदेश बांदेकर

मुंबई: काही दिवसांपूर्वी पडलेल्या मुसळधार पावसात चिपळूण येथील तिवारे धरण फुटून झालेल्या दुर्घटनेत मोठी मनुष्य हानी झाली. तिवारे गावाचही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अनेक जणांनी घरं पाण्याच्या मोठ्या लोंढ्यात वाहून गेली. पण या तिवरे गावाला आता सिद्धिविनायक मंदिर न्यासाने मदतीचा मोठा हात दिला आहे. याबाबतची माहिती न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली.

रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी सिद्धिविनायक मंदिर न्यासकडे तिवरे गाव दत्तक घेण्याची मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत न्यासाने गाव दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. यानुसार न्यास तिवरे गावातील धरण दुर्घटनाग्रस्त घरं व शाळा नव्याने बांधून देणार आहे. त्याच सोबतीने इतर गृहोपयोही साहित्य उपलब्ध करून देणार आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *