Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“भाजपच्या ओळखपत्रावर असलेल्या चंद्रकांत पाटलांच्या फोटो मुळे कार्यकर्त्यांना टोल माफी” : आ. सुरेश हाळवणकर

“भाजपच्या ओळखपत्रावर असलेल्या चंद्रकांत पाटलांच्या फोटो मुळे कार्यकर्त्यांना टोल माफी” : आ. सुरेश हाळवणकर

मिरज: भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आणि इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी केला आहे. सांगली येथे एका कार्यकर्ता मेळाव्यात भाजपचे प्रदेश सरचिटणीस व आमदार सुरेश हाळवणकर यांनी बोलण्याच्या ओघात एक गुपित साऱ्यांसमोर उघड केले. ते म्हणाले
“भाजपाचे ओळखपत्र दाखवल्यास टोल नाक्यावर टोल घेतला जात नाही. कारण त्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि आपला फोटो असतो.”

या मेळाव्यात काही कार्यकर्त्यांनी भाजपाचं ओळखपत्र दाखवूनही टोल नाक्यावरील कर्मचारी टोलमाफी देत नसल्याची तक्रार केली. यावर उत्तर देताना सुरेश हाळवणकर यांनी सांगितलं की, “हे ओळखपत्र टोलनाक्यावर चालत नाही हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पण ओळखपत्रावर चंद्रकांत पाटील आणि आपला फोटो असल्या कारणाने टोल नाक्यावरील कर्मचारी काही तरी समस्या निर्माण होऊ शकते, आपला टोल काढून घेतला जाऊ शकतो असा विचार करतात. आमदार, नेते आणि काही कार्यकर्ते गेले म्हणून काय होतं असा विचार करुन ते सोडून देतात”.

सर्वसामान्य माणसाला टोल-धाडीचा सामना करावं लागत असताना सत्ताधारी भाजपचे नेते फक्त आपल्या कार्यकर्त्यांचा विचार करत असल्याचे दिसत आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *