Fighter Jet
पाकिस्तानने सुखोई-३० लढाऊ विमान पाडल्याचा दावा भारताने फेटाळला
पुलवामा दहशतवादी हल्ला आणि त्यांनतर भारताने पाकिस्तान वर केलेल्या हवाई स्ट्राईकच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने २७ फेब्रुवारी रोजी नियंत्रण रेषेजवळ भारताच्या भूमीवर हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण हा प्रयत्न भारतीय हवाई दलाने हाणून पडला. पाकिस्तान ने केलेल्या या हल्ल्यात एफ-१६ हि अमेरिकन बनावटीची लढाऊ विमाने वापरली होती. पण भारताने केलेल्या प्रतिहल्ल्यात पाकिस्तानचे एक एफ-१६ विमान गारद केले. त्याच वेळी पाकिस्ताननेहि दावा केला कि त्यांनी आपले सुखोई-३० हे लढाऊ विमान पडले. पण संरक्षण मंत्रालयाने ह्याचा स्पष्ट शब्दात इन्कार केला आहे. तसेच अमेरिकेला पाकिस्तानने वापरलेल्या एफ-१६ विमानाचे अवशेष तपासासाठी दिले आहेत. एफ-१६ हि लढाऊ विमाने अमेरिकेने पाकिस्तानला भारताविरुद्ध न वापरण्याच्या अटीवर दिली होती. पाकिस्तानने त्या अटीचा भंग करत त्यांचा भारताविरुद्ध वापर केल्यामुळे अमेरिका आता काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरेल.
