अजित पवार यांचा चंद्रकांत पाटील यांना खुला चॅलेंज
काल पिंपरी-चिंचवडमधील भोसरीत झालेल्या जाहीर सभेत अजित पवार यांनी महसूल मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांना जाहीर आव्हान दिलं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बद्दल चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातील कार्यक्रमात एक वक्तव्य केलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना अजित दादा म्हणाले, “तुम्ही कोण सांगणार? तुम्हाला फुकटचा सल्ला कोणी द्यायला सांगितलाय चंद्रकांत पाटील साहेब. आपली पाटीलकी सांभाळ जरा. तुमची हिम्मत असेल तर माझं आव्हान आहे या माढयामध्ये, दाखवा उभं राहून. नाय तुम्हाला चारीमुंड्या चितपट केलं तर नाव नाही सांगणार.”