प्रा. वामन केंद्रे यांना दुसऱ्यांदा एन.एस.डी. कारंथ राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
एन.एस.डी. चे माजी संचालक व नामवंत कलावंत बी. व्ही. कारंथ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा बी. व्ही. कारंथ स्मृती राष्ट्रीय रंग पुरस्कार यंदा ज्येष्ठ रंगकर्मी व एन.एस.डी. चे संचालक प्रा. वामन केंद्रे यांना जाहीर झाला आहे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा तर्फे दुसऱ्यांदा हा पुरस्कार त्यांना दिला जात आहे. २००४ सालीही त्यांना ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. प्रा. केंद्रे यांचं भारतीय रंगभूमीवरील योगदान अतुलनीय आहे. त्यामुळेच त्यांची एन. एस. डी. च्या संचालक पदी निवड करण्यात आली.