मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात तगडा उमेदवार
मुंबई, दि. २३: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज बहुप्रतिक्षित अशी ६५ उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केली. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात केदार दिघे यांना रिंगणात उतरवण्यात आलं आहे. ठाण्यातून राजन विचारे, दिंडोशीतून सुनील प्रभू, अंधेरी पूर्वमधून ऋतुजा लटके, तर वरळीतून आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात असतील. गुहागरमधून भास्कर जाधव, वांद्रे पूर्वमधून वरूण सरदेसाई, कुडाळमधून वैभव नाईक, तर राजापूरमधून राजन साळवी निवडणूक लढवणार आहेत. हि यादी पाहिल्यास असं लक्षात येतं कि एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिलेल्या आमदार व पदाधिकाऱ्यांना टिकीटाची बक्षिसी दिली आहे.
नेवासामधून शंकरराव गडाख, बार्शीतून दिलीप सोपल, सावंतवाडीतून राजन तेली, राधानगरीतू के. पी. पाटील आणि शाहुवाडीतून सत्यजित पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. माहिममधून अमित ठाकरे यांच्या विरोधात महेश सावंत उमेदवार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून तिथून सदा सरवणकर रिंगणात आहेत.
