Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पनवेल मधून शिवसेनेच्या बबन पाटील यांची भाजपच्या प्रशांत ठाकूर यांच्या विरोधात बंडखोरी, वादाला उरणच्या राजकारणाची किनार

पनवेल मधून शिवसेनेच्या बबन पाटील यांची भाजपच्या प्रशांत ठाकूर यांच्या विरोधात बंडखोरी, वादाला उरणच्या राजकारणाची किनार

पनवेल/उरण: महाराष्ट्रात भलेही शिवसेना-भाजप ची युती झाली असली काही भागांमध्ये एकमेकांविरोधात बंडखोरी होण्याची शक्यता दिसते. ज्यात कुडाळ, ठाणे नंतर नंबर लागतो पनवेल व उरण विधानसभा मतदारसंघाचा. युतीच्या जागावाटपात पनवेल ची जागा भाजप तर उरण ची जागा शिवसेनेच्या वाट्याला आली. या फॉर्म्युलानुसार पनवेल विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार व सिडको अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनाच पुनः पक्षातर्फे उमेदवारी देण्यात आली आहे. तर उरण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान आमदार मनोहर भोईर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

पण उरण मतदारसंघातून भाजपचे निष्ठवंत महेश बालदी हे शिवसेनेच्या उमेदवारा विरोधात या ठिकाणी बंडखोरी करत आहेत. ते भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्याच्या जवळचे मानले जातात. बालदी यांचे बंड शांत करत भाजपवर दबाव टाकण्यासाठी शिवसेनेने एक वेगळीच खेळी केल्याचे दिसते. याच व्यूहरचनेचा एक भाग म्हणून आज दुपारी पनवेल मतदारसंघातून शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबन पाटील हे अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यास सांगण्यात आले असल्याचे कळते. बबन पाटील यांच्या उमेदवारीमुळे प्रशांत ठाकूर यांच्या अडचणी वाढल्याचे मानले जाते. लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्षातील नेते एकत्र प्रचार करताना दिसले. शेकापतर्फे हरेश केणी यांना या मतदारसंघतून उमेदवारी मिळणे जवळपास निश्चित झाले असून तेही आज आपला उमेदवारी अर्ज भरतील. शिवसेना भाजपच्या या वादात शेकाप बाजी मारते का हे पाहणे लक्षणीय ठरेल.

टीम महाराष्ट्र वार्ताने शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी वरिष्ठांकडे बोट दाखवत आदेश वरून आल्याचे नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *