Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर प्राणघातक हल्ला, पोटाचा वार झेलला हातावर

शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर प्राणघातक हल्ला, पोटाचा वार झेलला हातावर

उस्मानाबाद: उस्मानाबाद चे शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकू हल्ला झाल्याचे वृत्त नुकतेच हाती आले आहे. कळंब विधानसभा मतदारसंघात प्रचारानिमित्त फिरत असताना नायगाव पाडोळी या गावात ही घटना घडली.

सदर हल्ल्यातून ओमराजे यांना किरकोळ जखम झाली आहे. पोटावर करण्यात आलेला वार त्यांनी हातावर झेलला आणि त्यामुळे पुढील दुर्घटना टळली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा हल्ला पडोळी गावच्याच अजिंक्य टेकाळे याने केल्याची माहिती असून तो या घटनेनंतर घटनास्थळावरून पसार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *