Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

कल्याण येथे शिवसेनेचा पाकिस्तान विरोधात भव्य निषेध मोर्चा 

Featured Video Play Icon

कल्याण येथे शिवसैनिकांचा पाकिस्तान विरोधात भव्य निषेध मोर्चा 

कल्याण : जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी संघटनेने हल्ल्या केल्यानंतर या हल्ल्या विरोधात देशभरात तसेच सर्व क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे. नागरिक रस्त्यावर उतरून या भ्याड हल्ल्याचा निषेध करत शहीद जवानांना श्रद्धांजली वाहत आहेत.

या हल्ल्याच्या निषेधार्थ कल्याण पूर्वमध्ये देखील शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक तसेच कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. यावेळी शिवसेनेच्या नगरसेवकांनी पाकिस्तानचा ध्वज जाळून या हल्ल्याचा निषेध केला तसेच दहशतवाद्याचा पुतळा जाळून पाकला धडा शिकवण्याची मागणीदेखील त्यांनी ह्यावेळी केंद्रशासनाकडे केली. पाकिस्तान मुर्दाबाद, वंदे मातरम अशा घोषणाहि देण्यात आल्या.

 

ह्या पार्श्वभूमीवर कल्याण पूर्व परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला होता. परिसरातील रिक्षा बंद करण्यात आल्या तसेच शाळांना देखील सुट्टी देण्यात आली होती. कल्याण पूर्वेतील चक्की नाका या परिसरात हा निषेध मोर्च्या काढण्यात आला होता.

यावेळी स्थानिक नगरसेवक नवीन गवळी, नगरसेवक महेश गायकवाड, नगरसेवक निलेश शिंदे, सुभाष गायकवाड, राजू उजगरे, मारुती डोंगरे, भरत सोनवणे, वैभव राऊत, प्रल्हाद फुलोरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शहरातील सामान्य नागरिक देखील या निषेध मोर्च्यात सहभागी झाले होते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *