Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मेगाब्लॉक वार्ता : मध्य रेल्वेचा ‘विशेष’ ब्लॉक

Mumbai_Suburban_Railway-Web

मेगाब्लॉक वार्ता : मध्य रेल्वेचा ‘विशेष’ ब्लॉक

मध्य रेल्वेच्या दिवा स्थानकावर उद्या पादचारी पुलाचे गर्डर टाकण्यात येणार असल्याने शनिवारी रात्री पासूनच विशेष ब्लॉक घोषित करण्यात आला आहे.

याच बरोबर पश्चिम रेल्वेनेही रविवारी बोरिवली-अंधेरी मार्गावर ब्लॉक घेतला आहे. तसेच हार्बर लाईन वर कुर्ला – वाशी मार्गावरील लोकल फेऱ्या बंद राहणार असून वाशी-पनवेल आणि सीएसएमटी – कुर्ला मार्गावर विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

रविवारी ठाणे – कल्याण आणि कुर्ला – वाशी स्थानकांदरम्यान रुळांच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे.

दिवा स्थानकावर घेण्यात येणाऱ्या विशेष ब्लॉक काळात दिवा-पनवेल-दिवा पॅसेंजर रद्द राहणार आहे तसेच दिवा-सावंतवाडी पॅसेंजर पनवेल स्थानकात रद्द करण्यात येणार आहे.

या विशेष ब्लॉक काळात सर्व जलद मार्गावरील लोकल फेऱ्या अप आणि डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तसेच अप आणि डाऊन मार्गावरील लोकल फेऱ्या ११ ते ५ वाजेपर्यंत १० मिनिटे उशिराने धावणार आहेत.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *