यवतमाळमध्ये ‘मोदी गो बॅक’ च्या पोस्टर्सनी नरेंद्र मोदींचे स्वागत
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. विदर्भ आणि खान्देशमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकासकामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले.
तर यवतमाळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम सुरु होण्याआधीच नरेंद्र मोदींविरोधात पोस्टर्सबाजी करण्यात आल्याचं पहायला मिळाले. सकाळी 10 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हेलिकॉप्टरने यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे पोहोचले. ‘मोदी गो बॅक’चे पोस्टर्स पांडरकवडा येथे लावण्यात आले. पांढरकवडा कोंगरा मार्गावर मोदी गो बॅकचे पोस्टर्स लावत मोदींना यवतमाळमध्ये येण्यास विरोध करण्यात आला आहे.
पांढरकवडा कोंगरा मार्गावर मोदींविरोधात पोस्टर्स लावल्याची माहिती मिळताच, पोलिसांनी हे पोस्टर्स हटविल्याची माहिती समोर येत आहे. युवक काँग्रेसने हे पोस्टर लावले होते अशी माहिती मिळत आहे.