वाढीव मुदत न दिल्यामुळे राज्यपालां विरोधात शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयात याचिका
मुंबई: काल संध्याकाळी सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी दिलेल्या मुदतीआधी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांकडे ३ दिवसांची वाढीव मुदत मागितली होती. पण राज्यपालांनी ती मुदत नाकारत रात्री ८:३० वाजता तिसरा मोठा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले. राज्यपालांच्या या कृतीवर आक्षेप नोंदवत शिवसेनेने आज या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. शिवसेनेच्या वतीने ज्येष्ठ अधिवक्ता व काँग्रेस नेते कपिल सिब्बल आणि सुनील फर्नांडीस हे बाजू मांडत आहेत. आज काँग्रेसनेही राज्यपालांवर थेट टीका करत पक्षपातीपणाचा आरोप लगावला.
