सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांचे ६४ आमदारांचे बळ असलेल्या शिवसेनेला निमंत्रण
मुंबई: भारतीय जनता पक्षाने सत्ता स्थापनपेच्या दाव्यातून माघार घेतल्यानंतर राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी शिवसेनेला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले आहे. उद्या सायंकाळी ७ वाजण्यापूर्वी शिवसेनेला आपलं बहुमत सिद्ध करावं लागेल. त्यासाठी त्यांना एकूण १४५ आमदारांचा पाठिंबा दाखवणे गरजेचे आहे. सध्या शिवसेनेकडे अपक्ष आमदार मिळून ६४ आमदारांचे संख्याबळ आहे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे अनुक्रमे ५४ व ४४ आमदार आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारांचा शिवसेनेसोबत युती करण्यासंबंधी पक्ष नेतृत्वावर दबाव असल्याचे मानले जाते. या संदर्भात शिवसेना नेते संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत भेट घेऊ शकतात.
