Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“मी येणाऱ्या दोन दिवसांत राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे” : बिगबॉस फेम अभिजित बिचुकले

“मी येणाऱ्या दोन दिवसांत राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे” : बिगबॉस फेम अभिजित बिचुकले

सातारा: सध्याच्या घडीला महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा मोठा खेळ खंडोबा पाहायला मिळत आहे. भाजपला सत्ता स्थापनेसाठी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी निमंत्रण दिले आहे. पण संख्याबळ गोळा करता येईल का याबाबत साशंकताच आहे. पण या साऱ्या खेळात बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी एक गमतीशीर लेटर बॉम्ब टाकला आहे. अभिजित बिचुकलेंनी महाराष्ट्रातील सर्व आमदारांना सत्तास्थापनेसाठी पाठिंबा मिळावा यासाठीचे पत्र पाठवले असून यात त्यांनी साऱ्यांना मुख्यमंत्री पदासाठी आपल्याला पाठींबा द्यावा असे आवाहन केले आहे.

वाचा नेमकं काय लिहिलंय या पत्रात

“मी स्वत: गेली २० वर्षे समाजकारण आणि अपक्ष राजकारण करीत आहे, हे आपणांस माहिती आहेच. विशेष म्हणजे सातारा जिल्ह्यातील ताकदवान नेते माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरुद्ध संविधानाने दिलेला अधिकार वापरुन २००४, २००९, २०१४ आणि २०१९ अखेर सर्व लोकसभा आणि विधानसभा लढविल्या आहेत. मला राष्ट्रपती पद मिळावे यासाठी देखील मी प्रयत्न केले होते. महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूक २०१९ साठी मी १८२ वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. या पत्राद्वारे सध्या नवनिर्वाचित असलेल्या स्वाभिमानी, होतकरु, शिवप्रेमी तसेच समाजासाठी विशेष कार्य करण्याची जिद्द असलेल्या आमदार बंधू भगिनींना जाहीर आवाहन करतो की, आपण मला सर्वांनी आपले जात, धर्म आणि पक्ष बाजूला ठेवून मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा द्यावा आणि माझ्या मंत्रिमंडळामध्ये योग्य पदावर विराजमान व्हावे. इतर पक्षांनी आणि त्यांच्या प्रमुखांनी स्वत;चे कसे आणि किती वेळा भले करुन घेतले आहे हे तुम्हाला माहिती असेलच. तेव्हा अशा स्वार्थी पक्षप्रमुखांच्या नादाला लागण्यापेक्षा माझ्या बरोबर यावे हीच अपेक्षा. मी येणाऱ्या दोन दिवसांत राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे”

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *