Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि गटनेते एकनाथ शिंदे राज्यपालांकडे रवाना

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि गटनेते एकनाथ शिंदे राज्यपालांकडे रवाना

गेल्या अनेक दिवसांपासून चालू असलेली सत्ताकोंडी फुटण्याची चिन्ह असून त्याला कारणही तसंच आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. भेट झाल्यावर बाहेर पडताना त्यांच्या चेहऱ्यावर हास्य होते पण त्यांनी सत्तास्थापने बाबत माध्यमांना काहीच प्रतिक्रिया दिली नाही. पण असे कळते की शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात चर्चा होऊन सेनेला पाठिंबा देण्याबाबत एकमत झाल्याचे कळते.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेना विधिमंडळ गटनेते राज्यपालांच्या भेटीसाठी निघाल्याचे वृत्त आहे. खरच शिवसेना सत्ता स्थापनेचा दावा करणार की भाजपसारखेच सत्ता स्थापन करण्यास असमर्थ असल्याचे राज्यपालांना कळवणार या बाबत अद्याप सस्पेन्स कायम कायम आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *