शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी मुदतवाढ देण्यास राज्यपालांचा नकार; राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले निमंत्रण
मुंबई: युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते यांची राज्यपालांसोबतची बैठक संपली असून. राजभावनाबाहेर आल्या आल्या आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ”
आमची वेळ ही ७:३० पर्यंत असल्यामुळे आम्ही ६:४५ वाजता इथे पोचलो आणि राज्यपाल साहेबांना सांगितले की आमची सरकार स्थापन करण्याची इच्छा आहे.
ते पुढे म्हणाले की, “आम्ही राज्यपाल महोदयांकडे वेळ मागितला होता, त्यांनी तो आता आम्हाला नाकारला आहे पण आमचा दावा त्यांनी नाकारलेला नाही आहे, वेळ नाकारलेली आहे. राज्याला स्थिर सरकार देणे आमचे कर्तव्य आहे आणि ते आम्ही पार पाडू.”
या नंतर थोड्याच वेळात तिसरा मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राज्यपाल कोश्यारी यांनी सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले आहे. आता हे पाहणे महत्वाचे राहील की राष्ट्रवादी सत्ता स्थापनेचा दावा करते का? सध्यातरी सत्तास्थापनेचा हा पेच वाढताना दिसत आहे. यानंतर यहोड
